महिलांनो, प्रेग्नन्सीच्या काळात आहाराचा बाळावर कसा होतो परिणाम; नक्की पाहा ही शॉर्टफिल्म!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 August 2020

हा लघुपट यू ट्यूब चॅनेल- केईएम हॉस्पिटल पुणे येथे प्रेक्षकांसाठी उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे.

पुणे : गरोदरपणात (Pregnancy) निरोगी आहाराचे महत्त्व आणि त्या आहाराचे बाळावर होणारे सकारात्मक परिणाम याबाबतची जागरूकता निर्माण करण्यासाठी लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी केईएम रुग्णालयाने 'डेव्हलपिंग अवेअरनेस थ्रू एंटरटेन्मेंट' आणि निर्माते, कलाकार डॉ. मोहन आगाशे आणि दिग्दर्शक सुमित्रा भावे यांच्या सहयोगाने 'साखरेपेक्षा गोड' या लघुपटा'ची निर्मिती केली. तसेच या उपक्रमाचे उद्घाटन वेबीनारच्या माध्यमातून करण्यात आले. 

पुणे जिल्ह्यातील नागरिकांनो सतर्क राहा; हवामान विभागानं दिलाय 'ऑरेंज अलर्ट'!​

वरिष्ठ वैद्यकीय संशोधक आणि केईएम हॉस्पिटल, पुणेच्या डायबेटिज युनिटचे संचालक डॉ. चित्तरंजंन याज्ञिक यांच्या संशोधनावर आधारित असलेल्या या 25 मिनिटांचा लघुपटामुळे आजच्या पिढीतील तरूणांना भावी पिढींच्या आरोग्यदायी जीवनासाठी काय करावे याबाबत माहिती मिळेल. 

सुमित्रा भावे म्हणाल्या, "शॉर्ट फिल्म असो किंवा लॉंग फिल्म, त्याची निर्मिती करायला मला नेहमी आवडते, पण हा आरोग्यावर आधारित चित्रपट होता. डॉ. याज्ञिक यांच्या केलेल्या प्रदीर्घ संशोधनामुळे माझी उत्सुकता वाढवली. डॉ. याज्ञिक यांनी मला त्यांच्या संशोधनाची माहिती करून दिली आणि मला वाचनासाठी माहिती दिली. सध्या कोरोनाच्या या काळात सामाजिक संदेश पोहचविण्यासाठी आणि परिवर्तन घडविण्यासाठी एक माध्यम म्हणून असे लघुपट अधिक महत्त्वपूर्ण ठरतील.

खडकवासल्यापाठोपाठ पानशेतही आलंय भरत; मुठा नदीकाठच्यांनो दक्ष राहा!​

याप्रसंगी  केईएम हॉस्पिटल, पुणेच्या डायबेटिज युनिटचे संचालक डॉ.चित्तरंजंन याज्ञिक, डॉ. मोहन आगाशे, दिग्दर्शिका सुमित्रा भावे, मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया, जेटलाईन ग्रुप ऑफ कंपनीजचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजन नवानी, केईएम हॉस्पिटल, पुणेच्या व्यवस्थापक  डॉ. शिरीन वाडिया, केईएम हॉस्पिटल, पुणेच्या संशोधक विभागाच्या संचालिका डॉ. लैला गार्डा आणि डॉ. रोहन शाह यावेळी उपस्थित होते. हा लघुपट यू ट्यूब चॅनेल- केईएम हॉस्पिटल पुणे येथे प्रेक्षकांसाठी उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी दिलाय आंदोलनाचा इशारा; काय आहे कारण?​

"माझ्या संशोधनाचा फायदा लोकांपर्यंत पोहीचावे ही अपेक्षा नेहमी असते. विज्ञान आणि संशोधन हे सर्जनशील कलेद्वारे लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचू शकते याचा मला विश्‍वास आहे. एखाद्या गुंतागुंतीच्या वैज्ञानिक संवादापेक्षा दृश्य स्वरूपात एखादी गोष्ट ऐकणे जास्त प्रभावी ठरते."
- डॉ. चित्तरंजंन याज्ञिक, डायबेटिज युनिटचे संचालक- केईएम हॉस्पिटल

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Short films based on diet and physical nutrition during pregnancy