पैसे भरले तरी मीटर नाही; महावितरणचा अजब कारभार!

shortage of meters even after paying money to MSEDCL
shortage of meters even after paying money to MSEDCL

पुणे : "थ्री फेज मीटरसाठी नोव्हेंबर महिन्यात पैसे भरले आहेत, अद्यापही मीटर मिळालेले नाही, अजून किती वाट पाहायची,' धायरी येथील बी.व्ही. परमार सांगत होते. तर "नादुरुस्त मीटर बदलून मिळावे, यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून महावितरणच्या कार्यालयात चकरा मारतो आहे. पण मीटर उपलब्ध नाहीत, हेच उत्तर मिळते,' असे पर्वती येथील सागर सणस सांगत होता. 

महावितरणचा कारभार कशा प्रकारे सुरू आहे, त्यांची ही प्रातिनिधिक उदाहरणे. गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा शहरात मीटरचा तुटवडा निर्माण झाला आहे. पुणे शहरातील सर्व विभागात ही परिस्थिती आहे. त्यामुळे मीटरची पेंडन्सी वाढत चालली आहे. पैसे भरूनही मीटर मिळत नसल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा  

पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध आहेत. मागेल त्याला वीजजोड देणार, अशा घोषणा महावितरणकडून वारंवार करण्यात येतात. प्रत्यक्षात मात्र वीजग्राहकांना वेगळाच अनुभव येत असल्याच्या तक्रारी सकाळकडे प्राप्त झाल्या आहेत. चौकशीसाठी गेल्यानंतर " अद्याप मीटर आलेले नाहीत. येतील तेव्हा मिळेल,' हे एकच उत्तर देऊन परत पाठविले जात आहे. भांडण करून देखील हाती काहीच पडत नाही. त्यातून वादावादीचे प्रकार वाढू लागले आहेत. "नवीन वीजजोडसाठी मीटर मिळत नाही, तर नादुरुस्त मीटर बदलून कसे मिळेल' असा उलट प्रश्‍न महावितरण कार्यालयात चौकशी केल्यानंतर विचारण्यात आला. त्यातून महावितरणाच्या विभागीय कार्यालयात मीटरच्या चौकशी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 


''गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून नवीन वीजजोडसाठी पैसे भरले आहेत. परंतु मीटरच उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्राहकांचा त्रास सहन करावा लागत आहे. मीटर कधी उपलब्ध होणार हे देखील माहिती नाही.''
- महेंद्र धावडे (इलेक्‍ट्रिकल कॉन्ट्रक्‍टर) 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

''थ्री फेजचे मीटर सध्या उपलब्ध नाहीत. परंतु ग्राहकाना ते बाजारातून विकत घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. मीटरचे निकषही उपलब्ध करून दिले आहेत. ग्राहकांनी ते खरेदी केल्यानंतर महाविरणकडून ते मोफत तपासणी करून देण्यात येणार आहेत. तसेच मीटरची किंमती एवढी रक्कम त्यांच्या वीज बिलातून वळती करून दिली जाणार आहे.''
- सचिन तालेवार (मुख्य अभियंता, पुणे परिमंडल)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com