मी ‘जेईई’, ‘नीट’ ऑनलाइन क्लासला प्रवेश घेऊ का?

IITP
IITP

कोरोना महामारीच्या या काळात शाळा, कॉलेज व कोचिंग इन्स्टिट्यूटसारख्या शैक्षणिक संस्था पुन्हा कधी सुरू होतील याबद्दल अनिश्‍चितता आहे. पालक व इयत्ता अकरावीमधील विद्यार्थ्यांना ‘जेईई’ व ‘नीट’च्या ऑनलाइन कोचिंग क्लासला प्रवेश घ्यावा की, परिस्थिती सामान्य होईपर्यंत वाट पाहावी, हा संभ्रम आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हा संभ्रम दूर करण्यासाठी अकरावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता ‘जेईई’, ‘नीट’च्या २०२२मधील परीक्षेस बसणे योग्य ठरेल. या परीक्षेचा अभ्यासक्रम व काठिण्यपातळी २०२०मधील परीक्षेप्रमाणेच असेल. २०२१च्या परीक्षेसाठी अभ्यासक्रम कमी करण्यात आल्याची घोषणा झाली असून, २०२२च्या परीक्षेसाठी तसे करण्यात आलेले नाही. त्यामुळे पालक व विद्यार्थांनी त्वरित निर्णय घ्यावा व ऑनलाइन कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊन ‘जेईई’ व ‘नीट’चा अभ्यास सुरू करावा. अन्यथा त्यांना २०२२च्या परीक्षेचा अभ्यास पूर्ण करणे अशक्य बनेल.

आता आपण ऑनलाइन शिक्षण व वर्गातील शिक्षणामधील फायदे व तोटी पाहुयात.
फायदे -
  
१) ऑनलाइन कोचिंगमध्ये थेट संवाद साधणाऱ्या लाइव्ह लेक्चर्सबरोबरच ध्वनिमुद्रित लेक्चर्सही उपलब्ध होतात. त्यामुळे विद्यार्थी एखादी संकल्पना स्पष्ट होईपर्यंत लेक्चर अनेकदा पाहू शकतात. त्यामुळे लाइव्ह व ध्वनिमुद्रित लेक्चर मिळून वर्गातील शिक्षणाएवढाच परिणाम साधला जातो.
२) लाइव्हमध्ये लेक्चरमध्ये विद्यार्थ्याला शिक्षकांशी संवाद साधता येतो, हे वैशिष्ट्य असल्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गाप्रमाणेच आपल्या शंकांचे निरसन करून घेता येते.
३) ऑनलाइन टेस्ट व स्मार्ट असाईनमेंट प्लॅटफॉर्म व त्यातील आधुनिक ॲनॅलिटिक्समुळे विद्यार्थ्यांचे वर्गामधील टेस्टपेक्षा अधिक तंतोतंत मूल्यांकन होते. हे कृपया लक्षात घ्या, की ‘नीट’ परीक्षा २०२१पासून ऑनलाइन होण्याची शक्यता असून, जेईईची परीक्षा २०१९पासूनच ऑनलाइन झाली आहे.

तोटे - 
१) ऑनलाइन कोचिंगमध्ये विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो व त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो.
२) शिक्षण व विद्यार्थ्यांमधील प्रत्यक्ष संपर्क ऑनलाइन क्लासमध्ये दिसून येत नाही.
३) शिकताना आपल्या वर्गमित्रांची मदत मिळू शकत नाही. 

वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन पुण्यातील आयआयटीअन्स प्रशिक्षण केंद्र (आयआयटी-पीके) आणि त्यांच्या ‘एन्टरन्स मास्टर्स’ वैद्यकीय प्रवेश परीक्षा विभागाने लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण एकत्र देणारे ब्लेंडेड लर्निंग मॉडेल सादर केले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टूल्स, एलएमएस ॲप, इआरपी साईट हे ऑनलाइन प्लॅटफॉर्म व आर्टिफिशीयल इनटेलिजन्स उपयोग करणारे ऑनलाइन टेस्टिंग प्लॅटफॉर्म वापरून आयआयटी-पीकेने इजिनिअरिंग व मेडिकलच्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विनाअडथळा व फ्लेकसिबल कोचिंगचे मॉडेल विकसित केले आहे. शिक्षणातील अनेक संशोधनांचा वापर करून ‘आयआयटी-पीके’ने विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम केवळ चार तासांवर आणला असून, त्यात एक ते दीड तासाचे वेगवेगळे वर्ग घेण्यात येतात. 

विद्यार्थी या नावीन्यपूर्ण ऑनलाइन शिक्षणाच्या प्रेमात पडले असून, ते आपला इतर वेळी पुस्तके, वह्यांसारख्या नॉन-इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून अभ्यास करतात. यामुळे विद्यार्थ्यांना तणावरहित व सक्षम मॉडेल उपलब्ध होते. विद्यार्थ्यांना दररोज थोडा मोकळा वेळ व झोपेव्यतिरिक्त व्यायाम व ध्यानधारणेसाठी प्रोत्साहन दिले जाते.      

‘आयआयटी-पीके’ने गेली अठरा वर्षे असलेल्या कोचिंगमधील अनुभवातून विकसित केलेल्या या शिक्षणाच्या वैशिष्ट्यपूर्ण मॉडलेची पुण्याच्या कोचिंग विश्‍वास मोठी चर्चा आहे. ‘आयआयटी-पीके’ ही पुण्यातील सर्वांत जुनी जेईई कोचिंग इन्स्टिट्यूट असून, तिच्या ‘नीट’मधील यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ‘आयआयटी-पीके’ने २००२पासून आयआयटीमध्ये ९५४ पेक्षा अधिक रॅंक मिळवल्या असून, २५०० पेक्षा अधिक   विद्यार्थ्यांची नॅशनल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये निवड झाली आहे. (वर्षानुसार निकालासाठी संस्थेच्या www.iitpk.com या वेबसाइटला भेट द्या.) ‘एन्टरन्स मास्टर्स’नेही २०१३पासून ‘नीट’ कोचिंगच्या माध्यमातून ‘एमबीबीएससाठी’च्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये २० टक्के प्रवेशाचे खूप चांगले प्रमाण राखले आहे.

(अधिक माहितीसाठी www.neetmasters.com या वेबसाइटला भेट द्या.)
आयआयटी-पीकेमध्ये ‘जेईई’ कोचिंगमधील दोन वर्षांचा ‘ग्रॅण्डमास्टर्स’ प्रोग्राम शिकवला जातो. त्याचप्रमाणे  ‘नीट’ कोचिंमधील ‘एन्टरन्स मास्टर्स’मध्ये दोन वर्षांचा ‘टॉप डॉक्टर्स’ हा अभ्यासक्रम शिकवला जातो. नवीन बॅच १६ ऑगस्टपासून सुरू होणार असून, तुम्हाला फीमध्ये सूट हवी असल्यास तुम्ही हे पूर्णपणे ऑनलाइन असलेले दोन वर्षांचे कोचिंग निवडू शकता. आयआयटी-पीके सातवी, आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन आयाआयटी फाउंडेशन प्रोग्रामही सुरू करीत आहे.

ॲडमिशन संदर्भातील चौकशीसाठी संपर्क - ७०६६२५६२५६

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com