mahajyoti
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - ‘गावाकडे दुष्काळ आहे. आई-वडील शेतात मजुरी करतात. इकडे येण्यासाठी पैसे नसतानाही जुळवाजुळव करून परीक्षा देण्यासाठी पुण्यात आले. पाच तास परीक्षा केंद्रावर थांबलो; मात्र शेवटी परीक्षा रद्द झाली. आता पुन्हा परीक्षा घेतली तर आम्ही पुन्हा इथे कसे येणार?’ असा सवाल करत बीड जिल्ह्यातून आलेल्या महाज्योतीच्या एका विद्यार्थिनीला अश्रू अनावर झाले. ‘आम्ही शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी अधिकारी होण्याचे स्वप्नही बघायचे नाही का?’ असा संतप्त सवालही तिने उपस्थित केला.