Pune News : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह जिल्हा शल्यचिकित्सकांना कारणे दाखवा नोटीस

पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शहरी आरोग्य सेवा आयुक्तालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली.
Health Department

Health Department

sakal

Updated on

पुणे - नागरी आरोग्य संस्था आणि आरोग्य सेवांच्या कामकाजाच्या आढावा बैठकीला अनुपस्थित राहिल्याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शहरी आरोग्य सेवा आयुक्तालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शहरी आरोग्‍य आयुक्‍तालयाचे आयुक्‍त डॉ. सुनी भोकरे यांनी ही नोटीस बजावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com