अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरेच! टिपरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरेच! टिपरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

Published on

श्रेया गाडे
PTK26B01037

अन् अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अधुरेच
आव्हेतील श्रेया गाडेचा टिपरच्या धडकेत मृत्यू
..........
पटवर्धन कुरोली, ता. ६ : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेणाऱ्या अन् भविष्यात अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एका होतकरू तरुणीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शिक्षणासाठी पंढरपूरमध्ये आलेल्या या तरुणीचा प्रवास एका टिपरच्या धडकेत चक्काचूर झाला. श्रेया कांतिलाल गाडे (वय २०) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
श्रेया गाडे ही पंढरपूर तालुक्यातील आव्हे गावची. ती महाविद्यालयीन शिक्षणासाठी पंढरपूर येथे आली होती. तिची घरची परिस्थिती तशी बेताची होती. वडील शेती करतात तर आई अंगणवाडी सेविका आहे. यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु आहे. एक लहान भाऊ असून तो शिक्षण घेत आहे. श्रेयाचे दहावीपर्यंतचे शिक्षण पटवर्धन कुरोली येथे झाले तर बारावी चे शिक्षण नांदुरे येथे झाले. बारावीमध्ये (८७ टक्के) गुण मिळवले त्यावेळीच तिने आपण मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले.
घरची परिस्थिती बेताची असताना शिकण्याची जिद्द पाहून आणि अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या श्रेयाला पुढील शिक्षणासाठी पंढरपूरला पाठविले. तिने बीसीए प्रवेश घेऊन ती पंढरपूर येथील कराड नाका परिसरात असणाऱ्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात राहून आपले शिक्षण पूर्ण करू लागली आणि अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यास करू लागली.
रविवारी दुपारी चार वाजता श्रेया आणि मैत्रीण स्नेहा सायकलची पंक्चर काढण्यासाठी कराड नाका परिसरात गेल्या असताना भरघाव वेगाने आलेल्या टिपरची धडक बसली. यामध्ये श्रेयाचा जागीच मृत्यू झाला तर स्नेहाही गंभीर जखमी झाली आहे. श्रेयाच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण आव्हे गावावर शोककळा पसरली आहे.
शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न उरात बाळगून अनेक विद्यार्थी दहावी-बारावीपासूनच तयारीला लागतात. अशातच एक दुर्दैवी घटना पंढरपूर तालुक्यात घडली. या भीषण अपघातामुळे एका विद्यार्थिनीचा नाहक बळी गेला असून गाडे कुटुंबाचे अधिकारी होण्याचे मुलीचे स्वप्न कायमचे भंगले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com