

श्रीमंत आपटे स्मृती ब्रिज स्पर्धा आज
पुणे, ता. ९ ः पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित चौथ्या मधुकर ऊर्फ श्रीमंत आपटे स्मृती एकदिवसीय पेअर्स ब्रिज स्पर्धा उद्या (ता. १०) होणार आहे.
महाराष्ट्र ब्रिज संघटना (एमबीए) आणि पुणे विभागीय ब्रिज संघटनेच्या (पीआरबीए) मान्यतेने पीवायसी क्लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये होणाऱ्या या एकदिवसीय स्पर्धेत सुमारे ५० जोड्यांनी भाग घेतला आहे. यांत कौस्तुभ बेंद्रे, शुभम आचार्य, वीणा पाटणकर, चंद्रशेखर देशपांडे, शिरीष करकरे, शैला लोणकर आदी प्रमुख मानांकित खेळाडूंचा सहभाग आहे.
पीवायसी क्लबच्या वतीने क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, स्नूकर, टेबल टेनिस, बुद्धिबळ, पिकलबॉल, जलतरण आदी खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. यांत गेल्या तीन वर्षापासून ब्रिज स्पर्धेच्या रूपाने आणखी एका खेळाची भर पडली आहे, अशी माहिती पीवायसी क्लबचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे आणी ब्रिज विभागाच्या प्रमुख संयोगिता मोडक यांनी दिली.
यंदाच्या या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ३७ हजार ७०० रुपयांची रोख बक्षीसे दिली जाणार आहेत. स्पर्धेचे स्पर्धा संचालक म्हणून दिलीप करमरकर हे काम पाहणार आहेत. पीवायसी क्लबच्या सहयोगाने आपटे, केळकर, बापट, गोरे आणि आठवले परिवारातर्फे श्रीमंत आपटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा आयोजित करत आहोत असे अरुणा केळकर व मिलिंद आपटे यांनी सांगितले.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.