छत्रपतीने एका दिवसात ९४६२ मेट्रीक टनाचे केले उच्चांकी गाळप

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने ९ जानेवारी २०२२ रोजी एका दिवसामध्ये ९४६२ मेट्रीक टन उस गाळपाचा उच्चांक केला आहे.
Shri Chhatrapati Shivaji Sugar Factory
Shri Chhatrapati Shivaji Sugar FactorySakal

वालचंदनगर : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने (Shri Chhatrapati Shivaji Sugar Factory) ९ जानेवारी २०२२ रोजी एका दिवसामध्ये ९४६२ मेट्रीक टन उस गाळपाचा उच्चांक (Highest Crushing) केला आहे. कारखान्याचा गाळप हंगाम सुरळीत सुरु असून १२ लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्ष्ठि गाठण्यासाठी सर्व सभासद व शेतकऱ्यांनी सर्व उस गाळपासाठी छत्रपती कारखान्याला देण्याचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांच्या सह सर्व संचालक मंडळाने केले आहे. (Pune Marathi News)

छत्रपती कारखान्याचा चालू वर्षीचा गाळप हंगाम २४ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरु झाला आहे. ७८ दिवसामध्ये कारखान्याने ५ लाख ४६ हजार ६७३ मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून ५ लाख ६० हजार ६५० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.तसेच कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पातून २ कोटी ५४ लाख २२ हजार ६०० युनिटची वीज निर्मिती झाली आहे.

Shri Chhatrapati Shivaji Sugar Factory
फिल्मी स्टाईल चोरी; तोतया ED अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्याला 60 लाखाला लुटले

आत्तापर्यंत साखरेचा सरासरी उतारा १०.५५ मिळाला असून गतवर्षीच्या गळीत हंगामाच्या तुलनेमध्ये जास्त आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ६५०० मेट्रीक टन आहे. मात्र कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद, अधिकारी कर्मचारी,कामगार, उसतोडणी यंत्रणा यांच्या सहकार्यामुळे कारखाना क्षमतेपेक्षा जास्त गाळप करीत आहे. यापूर्वी कारखान्यामध्ये एका दिवसामध्ये ९२२२ मेट्रीक टन उस गाळपाचा उच्चांक केला होता.

रविवारी (ता.९) रोजी कारखान्याने ९४६२ मेट्रीक टन उस गाळपचा उच्चांक केला आहे. तसेच १५ डिसेंबर २०२१ पर्यंत गाळप केलेल्या उसाचा पहिला हप्ता २२०० रुपये प्रतिटना प्रमाणे सभासदांच्या खात्यावर जमा केला असल्याचे काटे यांनी सांगितले.सभासदांचा सर्व उस वेळेमध्ये गाळप होणार असून सभासदांनी सर्व उस कारखान्याला गाळपासाठी देण्याचे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com