

श्रीधर कंग्राळकर यांना
हिरोजी इंदुलकर पुरस्कार
मंत्री मकरंद पाटलांच्या उपस्थितीत सोमवारी वितरण
कऱ्हाड, ता. ७ ः नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (नरेडको) येथील शाखेतर्फे दिला जाणारा यंदाचा हिरोजी इंदुलकर पुरस्कार साताऱ्याचे कंग्राळकर असोसिएट्सचे संचालक श्रीधर कंग्राळकर यांना जाहीर झाला.
सोमवारी (ता. १०) श्री. कंग्राळकर यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. त्यावेळी बिल्डर्स डे २०२६ साजरा करून त्या कार्यक्रमात मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल. वास्तुकला, नगररचना आणि बांधकाम क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय व दर्जेदार योगदानाची दखल घेत नरेडकोतर्फे पुरस्कारासाठी निवड केली जाते. अनेक दशकांपासून व्यावसायिक कार्यातून श्री. कंग्राळकर यांनी वास्तुकला क्षेत्रात उच्च दर्जाची कामे साकारत समाजाभिमुख आणि गुणवत्तापूर्ण विकासाला दिशा दिली आहे. हिरोजी इंदुलकर पुरस्कार हा वास्तुकला व बांधकाम क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या योगदानाबद्दल प्रदान करण्यात येणारा नरेडकोचा प्रतिष्ठेचा सन्मान आहे.
W40733
श्रीधर कंग्राळकर
..............................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.