आगीत मालट्रक जळून खाक ; सुमारे ६० लाखांचे नुकसान : शिवडे हद्दीच्या ढाब्यावरील घटना
शिवडेत मालट्रक जळून खाक
उंब्रज, ता. १ ः शिवडे (ता. कऱ्हाड) येथील श्री गणेश ढाब्यावर उभा असलेल्या मालट्रकला अचानक लागलेल्या आगीत ट्रक पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना आज पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. ट्रकचालक व क्लिनर हे दोघेही प्रसंगावधान राखत बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीत ट्रकसह मालाचे सुमारे ६० लाखांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की राष्ट्रीय महामार्गावर शिवडे हद्दीत श्री गणेश ढाब्यावर थांबला होता. तमिळनाडू ते मुंबई असा कापड यासह रेडिमेड कपड्यांचा माल घेऊन जाणारा मालट्रक (डीडी ०३ पी ९१२८) हा ढाब्यावर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास श्री गणेश ढाब्यावर थांबला. पहाटेची वेळ असल्याने चालक व क्लिनर काही वेळातच गाडीत झोपी गेले. दरम्यान, काही वेळातच एका दुचाकीस्वाराने येऊन ट्रकच्या केबिनमध्ये झोपलेल्या चालकाला उठवून तुमच्या ट्रकला आग लागली आहे, असे सांगताच चालक व क्लिनर केबिनमधून सुरक्षित बाहेर आले. ट्रकमध्ये कापड असल्याने काही वेळातच ट्रकने पेट घेतल्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या ट्रकच्या आजूबाजूला लावण्यात आलेला उंब्रज येथील एका मालट्रकची ताडपत्री जळली, तर अन्य मालट्रक प्रसंगावधान राखत हलविण्यात आले. यावेळी ढाब्यावरील कर्मचारी तसेच इतर वाहनांचे चालक - क्लिनर यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आली नाही. तत्पूर्वी कऱ्हाड येथील नगरपालिकेच्या व जयवंत शुगरच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. तोपर्यंत मालट्रक मालासह जळून खाक होऊन सुमारे ६० लाखांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज घटनास्थळावरून व्यक्त होत होता. आगीचे नेमके कारण अस्पष्ट आहे. घटनेची माहिती उंब्रज पोलिसांना समजताच घटनास्थळी दाखल झाले.
------
00763
शिवडे ः येथील श्री गणेश ढाब्यावर उभा असलेल्या मालट्रकला लागलेली आग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

