पाटण, श्रीजानईदेवी भेटीला जेजुरी मार्तंड पदयात्रा पालखी सोहळा मार्गस्थ

पाटण, श्रीजानईदेवी भेटीला जेजुरी मार्तंड पदयात्रा पालखी सोहळा मार्गस्थ

Published on

निवकणेच्या जानाईदेवीच्या भेटीला जेजुरीचा मार्तंड

पालखी पदयात्रा मार्गस्थ; यात्रेस उद्यापासून प्रारंभ, धार्मिक कार्यक्रम

पाटण, ता. २२ ः फुलांनी सजवलेला आकर्षक रथ, खांद्यावर पालखी घेऊन निघालेले मानकरी, आई श्री जानाईचा उदो उदो, सदानंदाचा येळकोट’ असा गजर करत तीर्थक्षेत्र जेजुरी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील ग्रामस्थांचा श्री जानाईदेवी पायी पालखी पदयात्रा तीर्थक्षेत्र निवकणे (ता. पाटण) गावाकडे मार्गस्थ झाली.
मंगळवारपासून (ता. २४) तीन दिवस तीर्थक्षेत्र निवकणे येथील श्री जानाईदेवीची यात्रा होत आहे. ही पायी पदयात्रा जेजुरी गावाच्या सीमेलगत दौडज खिंडीत मार्गस्थ करण्यात आली. रथाला रुबाबदार बैलजोडी, पारंपरिक लोकवाद्य साथीला, तर भक्तांचा लोकगजर यामुळे परिसर गजबजून गेला. गुलाल, भंडाऱ्याची उधळण करीत बैलगाड्यांचा ताफा नागमोडी वाटेने निघाला. दीडशे किलोमीटर दूर असलेल्या पाटण तालुक्यातील निवकणेच्या श्री जानाईदेवीच्या यात्रेला पारंपरिक संत नागूमाळी यांनी शेकडो वर्षांपासून सुरू केलेला हा पायी पालखी सोहळा त्यांचे वंशज नागनाथ झगडे आणि त्यांचा परिवार आजही चालवत आहे.
मणदुरे येथे काऊदऱ्यावर श्री जानाईदेवीला वसुंधरा मानून मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता भक्तिभावाने निसर्गपूजा करतात. यावेळी वनउत्सवाच्या निमित्ताने बियांची उधळण, वृक्षारोपण, तसेच स्थानिक डोंगरवासी महिलांना ओटी भरून साडी-नारळ देण्याची परंपरा जपली जाते.
कार्यक्रमास पाटणकर, जेजुरीकर, वनविभागाचे अधिकारी आणि विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहतात. त्यामुळे या यात्रेला वनमहोत्सवाचे स्वरूपही प्राप्त झाले आहे. पूर्वपरंपरेप्रमाणे बैलगाड्यांनी प्रवास करण्याची पद्धत आजही सुरू आहे.
---------------------------

01225
जेजुरी : श्री जानाईदेवी पायी पदयात्रा पारंपरिक बैलगाड्यांच्या जथ्थ्यासह निवकणेकडे रवाना झाली.
---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com