

पाली, प्रथम पारितोषिक पटकवलेला श्री काळभैरव भारजे संघ व मान्यवर. (छायाचित्र, अमित गवळे)
Sakal
पाली: पुण्यातील नेहरू स्टेडियमवर रविवारी (ता. 29) सुधागडच्या कबड्डीपटूंनी आपल्या आक्रमक चढाया आणि अभेद्य पकडींनी मैदान गाजवले. सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि स्वयंभू हनुमान रहिवासी मंडळ, पुणे (चिवे-सुधागड) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'श्री बापूजी चषक' भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत श्री काळभैरव संघ भारजे याने अंतिम सामन्यात बाजी मारत प्रथम क्रमांकाचा मान मिळवला.