श्रीकृष्णनगरला एक लाखांची चोरी

श्रीकृष्णनगरला एक लाखांची चोरी
Published on

श्रीकृष्णनगरला एक लाखांची चोरी
अहिल्यानगर, ता. ८ ः शहरातील अमितनगर भागातील मंगलमूर्ती अपार्टमेंटमधील बंद घराचे कुलूप चोरट्यांनी तोडून सुमारे ९० हजार ४८२ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश शंकरराव कुवर (वय ७५, रा. श्रीकृष्णनगर, अहिल्यानगर-कल्याण रस्ता, अहिल्यानगर) हे दोन दिवस बाहेरगावी गेले होते. त्यांची मुलगी सुटीनिमित्त गुजरातला गेली होती. घराची जबाबदारी एका मित्रावर सोपवण्यात आली होती. बुधवारी रात्री घराला व्यवस्थित कुलूप लावलेले असताना, मध्यरात्री चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील ४.९३० ग्रॅमची सोन्याची अंगठी, ३.११० ग्रॅमची सोन्याची अंगठी, ०.७६० ग्रॅमची सोन्याची माळ, ७५ ग्रॅमचे चांदीचे ब्रेसलेट, ५५ ग्रॅमची चेन, १.५ ग्रॅमचे मंगळसूत्र व एक हजार रुपये रोख, असा एकूण ९० हजार ४८२ रुपयांचा मुद्देमाल चोरला. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gold theft at Indurikar Maharaj daughter wedding in Sangamner
MP मध्ये साकारणार १७ कोटींचा 'श्री परशुराम-श्री कृष्ण लोक'! इंदूरजवळील जानापाव ठरणार जागतिक आध्यात्मिक केंद्र; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Belagavi House Theft Case Gold Jewelry Robbery
Crime
Marathi News Esakal
www.esakal.com