वागदरीत परमेश्वर उचई  पंच कमिटी तर्फे स्टील उचई लोकार्पण

वागदरीत परमेश्वर उचई पंच कमिटी तर्फे स्टील उचई लोकार्पण

Published on

WDR26A00412
वागदरी (ता. अक्कलकोट) : येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी भाविक.
........
वागदरीत श्री परमेश्वर यात्रेनिमित्त रथाचे लोकार्पण
..........
सकाळ वृत्तसेवा
वागदरी, ता. ५ : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रेनिमित्त रथाचे लोकार्पण भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी पाच वाजता कलेणी वमने यांच्या घरातून उचई कळस, पार्वती आणि बसवण्णा मूर्तीचे वाजत-गाजत श्री परमेश्वर मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली
तर गुरुवारी पहाटे कळसाला महारुद्राभिषेक करण्यात आला. यावेळी आळंद शरणमटाचे चन्नवीर महास्वामी, मैंदर्गीचे अभिनव पटदेवरू यांच्या दिव्य सानिध्यात नवग्रह पूजा, पंच कळस पूजा, रुद्र पूजा, होम हवन, व परमेश्वर पार्वती अभिषेक व उचई लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उचई बनवणारे मादन हिप्परगा येथील कलाकार गौतम गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच मल्लाप्पा निरोळी, सिद्धारूढ नंदर्गी, शांताबाई नंदर्गी, माणिक नीलगार, शरणाबाई वमणे, शिवमूर्ती बटगेरी, कलेणी वमने या जुन्या पंच कमिटीतील व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला. त्यानंतर महास्वामीजींचे दर्शन व सुवासिनींचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उचई पंच कमिटीतर्फे उपस्थित सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उचई पंच कमिटीचे बसवंतराव वळसंग, बसवराज नडगेरी, शिवानंद ढोपरे, मुत्तन्ना दुधगी, परमेश्वर कोणजी, कलेणी वमने, धानप्पा वमने, गुरुनाथ वमने यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com