संग्रहालय बातमी संग्रहालय बातमी

संग्रहालय बातमी
संग्रहालय बातमी
Published on

जाहिरात बातमी

PNE26W40562
अहिल्यानगर ः श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनच्या शाळेत लेखांकन संग्रहालयाचे उदघाटन करण्यात आले.
---------------------
श्रीरामकृष्णमध्ये लेखांकन
संग्रहालयाचे उदघाटन
अहिल्यानगर, ता. ७ ः आयसीएआयच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल व वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटस स्टुडंट असोसिएशनतर्फे श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनच्या ''सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल'' आणि ''मोहनलाल रामअवतार मानधना ज्युनियर कॉलेज''मध्ये ''लेखांकन संग्रहालया''चे उदघाटन करण्यात आले. अध्यक्ष सीए अभयकुमार कटारिया व त्यांचे कार्यकारी मंडळ यांच्या प्रयत्नांतून व पुढाकारातून हे संग्रहालय उभारण्यात आले.
अध्यक्ष सीए सौरभ अजमेरा यांच्या हस्ते या संग्रहालयाचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी उपाध्यक्ष सीए रिंकिन पटेल, सचिव सीए बिशन शाह, खजिनदार सीए राकेश शाह आणि स्टुडंट असो. अध्यक्ष सीए राजेश अग्रवाल आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास स्कूल फाउंडेशनचे उपाध्यक्ष मोहनलाल मानधना व राजेश झंवर, सहसचिव बजरंग दराक हे उपस्थित होते. याप्रसंगी अजमेरा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वाणिज्य शाखेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. भविष्यात सीए प्रोफेशनला मिळणारे महत्त्व सांगितले. कटारिया यांनी अकाउंटिंग म्युझियमचे उदघाटन झाल्याचे घोषित केले. याप्रसंगी मानधना यांनी देखील विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेचे महत्त्व समजावून सांगितले. गोपाल धूत, शाळा समितीचे चेअरमन नंदकुमार झंवर, संस्थेचे सचिव डॉ. शरद कोलते यांनी सीए इन्स्टिट्यूटचे कौतुक केले.
शाळेत लेखांकन संग्रहालय उभारल्याबद्दल मुख्याध्यापिका गगन वाधवा यांनी उपस्थितांचे आभार मानले. हे संग्रहालय एक मौल्यवान शैक्षणिक साधन ठरून यामुळे लेखांकन क्षेत्राची व्याप्ती आणि त्याचा समृद्ध वारसा याबाबतची समज वाढणार आहे. विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनाही याचा लाभ होईल, असे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra School Education Principal Secretary Ranjit Singh Deol visited PM SHRI Zilla Parishad School, Ganori, appreciating its innovative teaching methods, AI lab, skill development initiatives and student-centric learning practices.
Ram Lalla Aarti Darshan Made Easy Learn Offline Pass Process and Skip Online Waiting
Padma Shri Dr D. Y. Patil, renowned educationist and former Governor, passes away at 90.
Ramayan Circuit
Marathi News Esakal
www.esakal.com