Aane News : आणे येथे हजारो भाविकांनी घेतला आमटी-भाकरी महाप्रसादाचा आस्वाद

आणे (ता. जुन्नर) येथे श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त, आज (ता. १२) दिवसभर हजारो भाविकांनी पारंपरिक चवीच्या 'आमटी-भाकरी महाप्रसादाचा' आस्वाद घेतला.
Aane Village
Aane VillageSakal

बेल्हे - आणे (ता. जुन्नर) येथे श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त, आज (ता. १२) दिवसभर हजारो भाविकांनी पारंपरिक चवीच्या 'आमटी-भाकरी महाप्रसादाचा' आस्वाद घेतला. या आमटीच्या निव्वळ मसाल्याचा खर्च सुमारे साडेनऊ लाख रुपये असून, हा सर्व खर्च दानशूर मंडळींच्या योगदानातून केला जातो. दरम्यान यावर्षी जवळपास ५५ कढाया आमटी बनविण्याचे नियोजन असल्याचे श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

आणे येथे श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थानला शासनाकडून तीर्थक्षेत्राचा 'ब' वर्ग दर्जा मिळाला असून, श्री रंगदास स्वामी पुण्यतिथी उत्सवाला गेल्या १३६ वर्षांपासूनची परंपरा आहे.

दरम्यान आज (ता. १२ व शनिवारी (ता. १३ ) या दोन दिवसात जवळपास ५५ कढाया आमटी बनविण्याचे नियोजन असल्याचे श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान संस्थेचे अध्यक्ष मधुकर दाते यांनी सांगितले. तर यासाठी लागणाऱ्या भाकरी घरटी ठरवून दिल्याप्रमाणे स्थानिक ग्रामस्थांकडून तसेच वाड्या - वस्त्यांवरील नागरिक आणून देतात. याठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे तसेच बैलगाडा शर्यतीचेही आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान आज (ता. १२) दुपारी श्री स्वामींच्या शाळिग्रामची मिरवणूक व महाआरती नंतर, आमटी महाप्रसादाचे दानशूर अन्नदाते मीराताई लक्ष्मण आहेर व लक्ष्मण धोंडीबा आहेर (गुरुजी) आणि परिवार, रामदास गुंजाळ व बंधू (गुंजाळवाडी), कै.बाळाजी आहेर यांच्या स्मरणार्थ धोंडीभाऊ आहेर, निवृत्ती आहेर व परिवार, कै.दत्तू आहेर यांच्या स्मरणार्थ सुमन आहेर व तुकाराम आहेर, सुषमा हाडवळे (राजुरी) व परिवार, कै.सुधाकर नांगरे यांच्या स्मरणार्थ सुहास व महेश नांगरे, वंदना उनकुले व परिवार, कै. पांडुरंग आहेर यांच्या स्मरणार्थ चंद्रभागा आहेर, विकास आहेर व परिवार यांचा देवस्थान संस्था व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

दरम्यान आज (ता. १२) दुपारी श्री स्वामींच्या शाळिग्रामची मिरवणूक व महाआरती नंतर, आमटी महाप्रसादाचा संपूर्ण खर्च करणाऱ्या सर्व दानशूर मंडळींचा सत्कार करण्यात आला. तसेच यावर्षीच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सर्व अन्नदानाचा व यात्रोत्सवाचा संपूर्ण खर्च मीराताई लक्ष्मण आहेर यांच्या ६५ व्या व लक्ष्मण धोंडीबा आहेर (गुरुजी) यांच्या ७५ व्या अभिष्टिंतन सोहळ्या निमित्त, आणे गावच्या माजी सरपंच डॉ. श्वेतांबरी दिपक आहेर, डॉ. दिपक लक्ष्मण आहेर, शितल किरण आहेर, किरण लक्ष्मण आहेर, अर्णव दीपक आहेर, विराज किरण आहेर, विवांश किरण आहेर परिवारातर्फे करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

येथील यात्रा उत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. यावर्षीपासून भाविकांना प्रथमच घरी नेण्यासाठीही माफक किमतीत आमटी महाप्रसाद वाटप करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान शनिवारी (ता. १३) योगिराज महाराज गोसावी यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com