श्रीरामाला देखील त्यांची लाज वाटेल : शशी थरूर

Sriram will also be ashamed Said Shashi Tharoor
Sriram will also be ashamed Said Shashi Tharoor

पुणे: "राष्ट्रभाषा ही राष्टवादीशी जोडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्याने देशाच्या एकतेला धोका आहे,' असे सांगून "त्यांना अपेक्षित असलेले हिंदू, हिदूत्व आणि हिंदुस्तानचा नारा देशाला आणि त्यांना देखील फायदेशीर नाही,' अशी टिका काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी रविवारी केली. 

ऑल इंडीया प्रोफोशनल काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यक्रमात थरूर बोलत होते. यावेळी पक्षाचे प्रवक्ते संजय झा, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, अभय छाजेड, सदानंद शेट्टी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
भगवान श्रीरामाला देखील त्यांची लाज वाटेल 
केंद्रातील भाजप सरकारची कार्यपद्धतीवर टिका करतानाच काँग्रेसची ध्येय धोरणे यावर थरूर यांनी सविस्तर भाषण केले. ''मी सुद्धा हिंदू आहे. त्याचा मला अभिमान आणि गर्व देखील आहे. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला जो हिंदू अपेक्षित आहे. तो मला मान्य नाही. हिंदू आणि हिदुत्वचे नाव घेऊन हिंदू धर्माला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. श्रीरामाचे नाव घेऊन कोणाला मारणे हे योग्य नाही. सत्ताधारी पक्षाकडून ज्या हिंदूत्वाचा आग्रह धरला जात आहे, त्याची भगवान श्रीरामाला देखील त्यांची लाज वाटेल,' असा टोलाही त्यांनी यावेळी भाजपला लगाविला. 

देशावर एकच भाषा लादणे हे एकतेला धोका निर्माण करणारे 
थरूर पुढे म्हणाले "राष्ट्रभाषा ही राष्ट्रवादीशी जोडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. राष्ट्रभाषेतूनच व्यवहार केले पाहिजे, या आग्रहामुळे सिंग, शर्मा, शुक्ला खूष होतील. पण सुब्रम्हण्यम, अय्यर, पिल्ले यांचे काय. त्यांना वेगळी भाषा शिकावी लागेल. देशावर एकच भाषा लादणे हे एकतेला धोका निर्माण करणारे आहे. त्यामुळेच भाजपला ईशान्य भारत आणि दक्षिण भारतात एकाही जागा मिळत नाही. 1965 मध्ये प्रांत रचना आपण स्विकारली. त्यावेळी त्रिभाषिक कार्यपद्दती मान्य केली. त्यामध्ये एक मातृभाषा, इंग्रजी आणि एक आवडीची भाषा निवडण्याची संधी देण्यात आली.''

 हिंदूचे नाव घेऊन हिंदू धर्माला बदनाम करण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून सुरू
सर्वमान्य भारत घडविण्याचे काँग्रेसचे ध्येय आहे. स्वतंत्रपूर्व काळात आणि स्वतंत्रानंतरही काँग्रेसची ही भूमिका राहिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या घटनेला हेच अपेक्षित आहे, असे सांगून थरूर म्हणाले," जाती अथवा धर्मावरून कोणतीही भेद करणे योग्य नाही, ही आपली देशाची संस्कृती आहे आणि काँग्रेसची देखील. महात्मा गांधीच्या विचारावर चालणारी काँग्रेस आहे. स्वतंत्र भारत हा सर्वांचा आहे. या उलट हिंदूचे नाव घेऊन हिंदू धर्माला बदनाम करण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून सुरू आहे. त्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊ लढण्याची गरज आहे.'' 

गांधीवाद हाच खरा राष्ट्रवादी वाद असल्याचे पटेल यांना जाणवले. 
स्वतंत्रपूर्व काळात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचार थोडे हिंदूत्ववादाकडे झुकणारे होते, असे सांगून थरूर म्हणाले,"पण देश स्वतंत्र झाल्यानंतर पटेल यांना देखील गांधीवादाचे महत्व पटले. गांधीवाद हाच खरा राष्ट्रवादी वाद असल्याचे त्यांना जाणवले. परंतु भाजपकडून जाणीवपूर्वक काही गोष्टी लपविल्या जात आहेत. त्यांचे पटेल, महात्मा गांधी यांचे जे सोयीस्कर विचार आहेत. तेवढेच हायजॅक करण्याचे काम सुरू आहे.'' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com