

Shri Vallabh Nagari Sahakari Patasanstha Junnar market yard branch renovation
Sakal
जुन्नर : जुन्नर शहर व परिसरातील नागरिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या दूरदृष्टीतून सुरू करण्यात आलेली श्री वल्लभ नागरी सहकारी पतसंस्था सभासद, ठेवीदार व ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरलेली असून सहकार क्षेत्रात पतसंस्थेने नावलौकिक प्राप्त केला असल्याचे गौरवोद्गार जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांनी काढले. जुन्नर येथे मंगळवार ता. 23 रोजी श्री वल्लभ नागरी सहकारी पतसंस्थेच्या मार्केट यार्ड शाखेच्या नूतनीकरण उद्घाटन समारंभ प्रसंगी बेनके बोलत होते.