श्री विठ्ठल अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा पंढरपुरात संपन्न
UPR26B07510
पंढरपूर : श्री विठ्ठल अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित नागेश फाटेंसह संचालक व अधिकारी.
........
श्री विठ्ठल अर्बन सोसायटीचा
द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
पंढरपूर, ता. २२ : येथील श्री विठ्ठल अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. पंढरपूर या संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संस्थेच्या कार्यालयात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
संस्थेचे चेअरमन श्री. नागेश फाटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. गेल्या दोन वर्षांत संस्थेने केलेल्या प्रगतीचा आढावा घेत, सभासदांच्या विश्वासार्हतेमुळेच हे यश साध्य झाल्याचे श्री. फाटे यांनी यावेळी नमूद केले.
याप्रसंगी व्हा. चेअरमन अण्णा यशवंत नागटिळक, डॉ. रमेश फाटे, हणमंत काळे, उमेश फाटे, अर्जुन सावंत, बाळासाहेब बागल, अभिमन्यू पवार, ओंकार फाटे, औदुंबर कांबळे, औदुंबर माने, संजय पवार, शिवाजी रणदिवे, गोरख बागल, श्रीराम तांदळे, शशिकांत बागल, शांतीनाथ बागल, संजय बागल, समाधान सुभाष फाटे, बाळासो फाटे, मॅनेजर संग्राम कापसे आदी मान्यवर उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन मॅनेजर संग्राम कापसे व कर्मचाऱ्यांनी केले होते.

