esakal | जाणून घ्या कशी असावी संतुलित जीवनशैली; श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांचे रविवारी मार्गदर्शन  
sakal

बोलून बातमी शोधा

जाणून घ्या कशी असावी संतुलित जीवनशैली; श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांचे रविवारी मार्गदर्शन  

संतुलित जीवनशैली परिभाषित करण्यासाठी समग्र आरोग्य आणि निरोगीपणाची सांगड घालणे खूप आवश्‍यक आहे. हा वेबिनार इंग्रजी माध्यमातून होणार असून, ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे हे मार्गदर्शन करणार आहेत.

जाणून घ्या कशी असावी संतुलित जीवनशैली; श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांचे रविवारी मार्गदर्शन  

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - बदललेल्या जीवनशैलीला अनुसरून स्वतःमध्ये काय बदल करणे आवश्‍यक आहे, जेणेकरून समाज बदलण्यास आणि निसर्गाशी एकरूप होण्यास मदत होईल, याबाबत मार्गदर्शन करणाऱ्या ‘लाइफ इन बॅलन्स’ (संतुलित जीवनशैली) या विषयावरील खास मोफत ऑनलाइन वेबिनारचे येत्या रविवारी (ता. ३०) ‘एसआयआयएलसी’तर्फे आयोजन केले आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
जगाची सद्यःस्थिती केवळ साथीच्या रोगाचा परिणाम नाही, तर मानवाने केलेले गैरवर्तन आणि निसर्गाचा अनादर, भ्रष्टाचार आणि आरोग्याला घातक जीवनशैलीदेखील आहे. म्हणूनच असुरक्षिततेवर मात करण्यासाठी आणि जीवनात सुसंवाद साधण्यासाठी निसर्गास अनुरूप अशा जीवनशैलीचा प्रचार करणे आवश्‍यक आहे. म्हणूनच संतुलित जीवनशैली परिभाषित करण्यासाठी समग्र आरोग्य आणि निरोगीपणाची सांगड घालणे खूप आवश्‍यक आहे. हा वेबिनार इंग्रजी माध्यमातून होणार असून, ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे हे मार्गदर्शन करणार आहेत. लवकरच मराठीतूनही हा वेबिनार घेण्यात येईल.

ऑनलाइन वेबिनारविषयी... 

    कधी ः रविवारी (ता. ३०) सायंकाळी ४ ते ५ वाजता 
    नावनोंदणीसाठी -  https://siilc.edu.in/register/ 
या संकेतस्थळाला भेट देऊन तिथे ‘रजिस्टर’ टॅबला क्‍लिक करून त्यातील गुगल फॉर्म भरून नावनोंदणी करावी. 
    अधिक माहितीसाठी संपर्क ः ७०३८०७४४१५

loading image
go to top