

Civic Backlash: Controversial Nameboard Removed from Baner Cancer Hospital
Sakal
पुणे : बाणेर येथे पुणे महापालिकेतर्फे पीपीपी तत्त्वावर उभारण्यात आलेल्या कर्करोग रुग्णालयाला स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी त्यांचे वडील स्वर्गीय प्रा. यशवंतराव भिमाले यांचे नाव दिल्याचा फलक अचानक रुग्णालयाला लावला. मात्र यावर चहूबाजूने टीकेची जोड उठल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनापूर्वी हा फलक काढून टाकण्यात आल्याने भिमाले यांना उपरती झाल्याचे स्पष्ट झाले आहे.