बाबूराव दौंडकर स्मारक समितीचे पुरस्कार जाहीर

बाबूराव दौंडकर स्मारक समितीचे पुरस्कार जाहीर
Published on

शिरूर, ता. ५ : कृषी, पर्यावरण, जलव्यवस्थापन व गोसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना बाबूराव दौंडकर स्मारक समितीच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते रविवारी (ता. ९) रांजणगाव गणपती येथे या गुणवंतांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष ॲड. धर्मेंद्र खांडरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला समितीचे उपाध्यक्ष धनंजय गायकवाड, कोषाध्यक्ष सागर फराटे, संचालक दत्तात्रेय दरेकर, बाळासाहेब पुंडे, हेमलता पुंडे, सूरज दामोदर उपस्थित होते. रांजणगाव गणपती येथील समितीच्या सभागृहात होणाऱ्या या सोहळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. समितीच्या वतीने गेल्या २९ वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.

पुरस्कार प्राप्त व्यक्तींची नावे
राजेंद्र गदादे (तांदळी) : स्व. कांचनभाई शहा जलव्यवस्थापन पुरस्कार
उमेश रणदिवे (रांजणगाव सांडस) : स्व. बिंदूमाधव जोशी पर्यावरण पुरस्कार
विजीत मांढरे (शिक्रापूर) : स्व. मधुकर टेमगिरे कृषी गौरव पुरस्कार
हरिदास खिलारी (टाकळी हाजी) : स्व. संतोष गांधी गोसेवा पुरस्कार
शहाजी दळवी (कान्हूर मेसाई) : स्व. गणपत खेडकर सेवाकार्य पुरस्कार
सुनीता फराटे (मांडवगण फराटा) : स्व. बबुताई दौंडकर कृषी गौरव पुरस्कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com