

शिरूर: शहरात दिशादर्शक फलक आणि गल्लीबोळांना नामफलक लावण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रीतेश फुलडाळे यांनी सोमवारी (ता.१८) नगर परिषद मंगल कार्यालयासमोर उपोषण केले. नगर परिषदेने या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रात्री उशिरा हे उपोषण मागे घेण्यात आले.
शिरूर ही मोठी बाजारपेठ असल्याने येथे बाहेरील नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, शासकीय कार्यालये, रुग्णालये आणि स्मशानभूमीकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या प्रश्नी फुलडाळे गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करत होते. प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी अखेर आंदोलनाचा पवित्रा घेतला.
सोमवारी सायंकाळी नगर परिषदेचे बांधकाम सभापती सुनील जाधव, स्वच्छता सभापती एजाज बागवान आणि नगरसेवकांनी फुलडाळे यांच्याशी चर्चा केली. १२ मे रोजीच्या सर्वसाधारण सभेत फलक लावण्याबाबत ठराव मंजूर झाला असून, लवकरच कामाला सुरुवात होईल, असे लेखी पत्र नगर अभियंता एस. आर. मुंगसे यांनी दिले. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोबत फोटो : शिरूर : शहराच्या विविध भागात दिशादर्शक फलक लावावेत, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रीतेश फुलडाळे यांनी सोमवारी येथील नगर परिषदेच्या मंगल कार्यालयासमोर केलेल्या उपोषण आंदोलनात विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
06373
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.