

प्रा. श्रीराम पुजारी जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात संगीत महोत्सव
शनिवारपासून दोन दिवस आयोजन; नामवंत कलाकारांच्या गायन-वादनाची मेजवानी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १९ : सोलापूरचे सांस्कृतिक राजदूत, विद्यार्थिप्रिय शिक्षक व समाजधुरीण प्रा. श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दी सांगता सोहळ्यानिमित्त श्रीराम पुजारी प्रतिष्ठानतर्फे पुण्यात दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोथरूड येथील ‘पुण्याई सभागृहात’ शनिवारी (ता. २२) व रविवारी (ता. २३) हा महोत्सव रंगणार आहे.
महोत्सवाचे उद््घाटन शनिवारी (ता. २२) सायंकाळी पाच वाजता प्राजक्ता मराठे यांच्या शास्त्रीय गायनाने होईल. त्यानंतर बनारस घराण्याचे पं. दिवाकर कश्यप व पं. प्रभाकर कश्यप (कश्यप बंधू) यांचे युगल गायन होणार आहे.
रविवारी (ता. २३) सकाळी नऊ वाजता ज्येष्ठ अभिनेते अरुण सरनाईक यांच्या जीवनावरील विशेष चित्रफीत दाखविण्यात येणार असून, त्यानंतर देवकी पंडित यांचे गायन होईल. सायंकाळी पाच वाजता पं. रूपक कुलकर्णी यांचे बासरीवादन, तर सांगता पं. ओंकार दादरकर यांच्या गायनाने होईल.
कलाकारांना यती भागवत, आशय कुलकर्णी, कालिनाथ मिश्रा, सिद्धेश बीचोलकर, मिलिंद कुलकर्णी आदी साथसंगत करतील. हा संगीत महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, संगीतरसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ललिता दातार, डॉ. नवनीत तोष्णीवाल व रघुवीर जोशी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.