शिक्रापूर - शासकीय स्कॉलरशिपमध्ये राज्यात अव्वल असलेल्या शिरूरकरांचा प्रशासकीय टक्काही वाढता असून, यावेळीच्या नाशिक येथील फौजदार दीक्षान्त समारंभात एकाच वेळी तब्बल २० शेतकरी कुटुंबातील शिरूरकरांनी आपल्या आईवडिलांसमवेत फौजदार म्हणून खाकी वर्दीची शपथ घेतली.