

शिरूर, ता. १८ : खाऊच्या आमिषाने सहा वर्षांच्या बालिकेला घरात बोलावून अत्याचार करणाऱ्या नराधमाला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी (ता. १८) सकाळी दहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. रोहिदास दत्तात्रेय वाकचौरे (वय ६५, मूळ रा. वासुंदे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी कामाच्या निमित्ताने शिरूर तालुक्यात वास्तव्यास आला आहे. रविवारी सकाळी पीडित मुलीचे कुटुंबीय कामाच्या निमित्ताने बाहेर गेले असताना वाकचौरे याने खाऊचे आमिष दाखवून तिला आपल्या खोलीत बोलावले व अत्याचार केला. या छोट्या बालिकेला मारहाण करून धमकी दिल्याने ती घाबरून घरी आली व रडत बसली होती. दुसऱ्या एका शेजाऱ्याने तिच्या पालकांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी घरी धाव घेतली असता, मुलीने अत्याचाराची माहिती दिली. यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुमार कदम यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन संशयित वाकचौरे याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती भोसले यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.