जमिनीच्या वादातून सख्ख्या भावांमध्ये हाणामारी

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावांमध्ये हाणामारी
Published on

गुनाट, ता. १८ : वडिलांच्या जमिनीचा हिस्सा मागितल्याच्या रागातून सख्ख्या भावांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. लोखंडी रॉडने केलेल्या या मारहाणीत मारुती ढोरजकर गंभीर जखमी झाले असून, शिरूर पोलिसांनी दोन्ही गटांच्या परस्परविरोधी फिर्यादींवरून गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मारुती ढोरजकर यांनी रविवारी (ता. १६) भाऊ आनंदा ढोरजकर यांच्याकडे जमिनीच्या वाटणीची मागणी केली. याचा राग धरून आनंदा ढोरजकर यांनी बेकायदा जमाव जमवून मारुती यांना लोखंडी रॉडने पायावर मारहाण केली. पतीला वाचविण्यासाठी आलेल्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली असून, दुचाकीचेही नुकसान केले आहे. या प्रकरणी मारुती ढोरजकर यांनी आनंदा ढोरजकर यांच्यासह सहा जणांविरोधात तक्रार दिली आहे.
दुसऱ्या घटनेत, हेमा शरद ढोरजकर (रा. निमोणे) या शेतात जात असताना त्यांना पल्लवी जगताप, वैशाली खैरे यांच्यासह आठ जणांनी अडवून मारहाण केली. या प्रकरणी त्यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस हवालदार प्रताप टेंगले व विनोद मोरे पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com