

शिरूर, ता. ५ : कोयत्यासह घातक हत्यारे बाळगून फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. शिरूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास गस्तीदरम्यान ही कारवाई केली.
राज रेखा अंधारे (वय २१, रा. शेळकेवस्ती, रांजणगाव गणपती, ता. शिरूर) व सूरज संतोष उघडे (वय १९, रा. मोडकाई वस्ती, रांजणगाव गणपती, ता. शिरूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून कोयता, स्क्रू ड्रायव्हर व इतर घातक हत्यारांसह पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र. एमएच ४५ एबी २७४९) पोलिसांनी जप्त केली. शहर व परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शिरूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रात्र गस्त वाढविली असून, मध्यरात्री दोनच्या सुमारास हे पथक गस्त घालीत असताना शहरापासून जवळच रामलिंग रस्ता परिसरातील नवीन नगर परिषदेकडे जाणाऱ्या अंधाऱ्या रस्त्यावरून दोन तरुण दुचाकीवरून संशयास्पदरीत्या फिरताना दिसल्याने पथकाने चोहोबाजूने घेरून हार्दे रुग्णालयासमोर त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता एकाच्या कमरेला कोयता, तर एकाच्या पॅंटच्या खिशात लोखंडी स्क्रू ड्रायव्हर आढळून आला. याबाबत माहिती विचारता ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत, अशी माहिती पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.