पुणे - विमाननगर परिसरातील कॉल सेंटर कंपनीच्या पार्किंगमध्ये हल्लेखोर तरुणीवर निर्दयपणे चॉपरने वार करीत होता. त्यावेळी तेथे जमलेले नागरिक केवळ बघ्यांच्या भूमिकेत होते. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमातून समोर आला अन॒ नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. निष्पाप तरुणीवर जीवघेणा हल्ला होताना बघ्यांची गर्दी पाहून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.