
तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील शेतकरी कुटुंबातील शुभम गणेश ढमढेरे यांची बँक ऑफ महाराष्ट्रच्या "प्रोबेशनरी ऑफिसर" (वर्ग एक अधिकारी) या पदावर निवड झाली आहे.पुणे जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय दत्तात्रय ढमढेरे व विष्णुपंत ढमढेरे यांचे नातू म्हणून ओळख असलेल्या शुभम गणेश ढमढेरे यांनी स्पर्धा परीक्षेचा जिद्दीने अखंडित अभ्यास करून बँकेचा अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले आहे. आजी - आजोबा, आई-वडिलांनी दिलेली प्रेरणा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन याच्या जोरावर शुभमने अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले आहे.