esakal | पुणे : भांडण मिटविण्याच्या बहाण्याने बोलावून तरुणाचा निर्घृण खून
sakal

बोलून बातमी शोधा

Shubham Nakhate murder of a young man in Thergaon Pune
  • पूर्ववैमनस्यातून थेरगावात तरुणाचा निर्घृण खून 
  • भांडण मिटविण्याच्या बहाण्याने घेतले बोलावून 

पुणे : भांडण मिटविण्याच्या बहाण्याने बोलावून तरुणाचा निर्घृण खून

sakal_logo
By
मंगेश पांडे

पिंपरी : भांडण मिटविण्याच्या बहाण्याने बोलावून घेत सहा जणांच्या टोळक्याने पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून केला. ही घटना थेरगाव येथे घडली. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शुभम जनार्दन नखाते (वय 22, रा.  दत्त मंदिराजवळ, नखातेनगर, थेरगाव ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील (वय 23, रा. तापकीर चौक, काळेवाडी) प्रवीण ज्योतिराम धुमाळ (वय 21), अविनाश धनराज भंडारी (वय 23),  मोरेश्वर रमेश आष्टे, (वय 21), अजय भरत वाकेडे (वय 23, सर्व रा. तापकिरनगर, काळेवाडी) यांना पोलिसांनी  अटक केली आहे. तर राज तापकीर, प्रेम वाघमारे हे फरारी आहेत.

दोन दिवसांपूर्वी ज्ञानेशर पाटील याच्यासोबत झालेले भांडण मिटविन्याच्या बहाण्याने आरोपींनी शुभम नखाते यांना बुधवारी (ता.19) रात्री नऊच्या सुमारास तापकीर चौकाजवळील धोंडिराज मंगल कार्यालयाजवळ बोलाविले. त्यानंतर मंगल कार्यलयात शुभम यांच्यावर धारदार हत्याराने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाकड पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून दोन जणांचा शोध सुरु आहे.

loading image
go to top