वाढदिवसाचा खर्च टाळून प्राथमिक शाळेला मदत
वाढदिवसाचा खर्च टाळून
प्राथमिक शाळेला मदत
उपसरपंच शुभम पवार यांचे दातृत्व
भुईंज, ता. ३१ : आजकालच्या जमान्यात वाढदिवस तरुण मुलांचा म्हटलं, की मित्रांबरोबर पार्टी, मित्रांसोबत केक कापत वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याची इच्छा असते. त्यातून काही लोक समाजाचे ऋण म्हणून अनाथाश्रम किंवा मूकबधिर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करतात. असाच उपक्रम वाढदिवसाचा खर्च टाळून भुईंजचे उपसरपंच
शुभम पवार यांनी आपला वाढदिवस जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला संपूर्ण रंगरंगोटी करून चिमुकल्यांसोबत साजरा केला.
या वेळी मुख्याध्यापिका सविता जगताप म्हणाल्या, ‘‘गावातील होतकरू तरुणांनी लहान चिमुकल्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करताना खूप आनंद झाला. आपल्या गावात सुरू असलेले काम दिसायला जरी छोटे असले, तरी त्याचे मूल्य खूप मोठे आहे. ज्या इमारतीतील खोलीमध्ये बसून ही मुले शिक्षण घेतात तीच भावी पिढी म्हणून पुढे येतात. अशा या मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजेत. त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, तसेच येथे अध्यापनाचे काम करणाऱ्या शिक्षकांना सुद्धा एक चांगल्या प्रकारचे वातावरण येथे निर्माण झाले पाहिजे, त्यादृष्टीने शुभम पवार यांच्याकडून झालेले काम कौतुकास्पद आहे. प्रारंभी शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका सविता जगताप, विजय पवार, छाया शिंगटे, मनीषा राऊत, अश्विनी जाधव, शीतल फावडे, ज्योती ससाणे, सुजाता बोडरे यांनी शाळेला केलेल्या सहकार्याबद्दल शुभम पवार यांचा सन्मान केला.
या वेळी कारखान्याचे संचालक प्रकाश धुरगडे, राजू भोसले, गजानन भोसले, अमित लोखंडे, बापूसाहेब जाधवराव, कांतिलाल पवार, राजेंद्र सोनावणे, सुनील शेवते, विनोद जाधव, लालासाहेब कांबळे, संतोष भोसले, भैया जाधव, गोपी भोसले, मनजित जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो :.......... BHU26B01430
भुईंज : शुभम पवार यांच्या दातृत्वातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला केलेली रंगरंगोटी. (विलास साळुंखे : सकाळ छायाचित्रसेवा)
.............................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

