Garbage Project : बाणेर कचरा प्रकल्प ३१ जानेवारी पर्यंत बंद करा

बाणेर येथील सूस रस्त्यावरील कचरा प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत नांदे चांदे गावातील आरक्षीत ठिकाणी स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरु केली.
garbage
garbageesakal

पुणे - बाणेर येथील सूस रस्त्यावरील कचरा प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत नांदे चांदे गावातील आरक्षीत ठिकाणी स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरु केली. या जागेचा ताबा पुढील काही दिवसात मिळाल्यानंतर ६ मार्च पासून येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरु केला जाईल असे आश्‍वासन महापालिकेने या भागातील नागरिकांना दिले आहे. मात्र, त्यास नागरिकांनी विरोध करत हा प्रकल्प ३१ जानेवारीपूर्वी बंद करा अशी मागणी केली आहे.

बाणेर येथील सूस रस्त्यावरील कचरा प्रकल्प बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने देऊनही महापालिका जागा मिळत नसल्याचे कारण देत गेल्या दोन अडीच वर्षापासून हलविण्यास टाळाटाळ करत आहे. यावर बैठक झाल्यानंतर ३१ डिसेंबर पर्यंत बंद करून इतरत्र स्थलांतरित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यानंतरही प्रशासनाकडून ठोस भूमिका घेतली जात नव्हता.

यावरून गेल्या आठवड्यात माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली होती. त्यानंतर अखेर प्रशासनाने यासंदर्भात सूस रोड बाणेर विकास मंचाच्या अध्यक्षांना पत्र दिले आहे. त्यामध्ये बायो सीएनजी प्रकल्प पीएमआरडीएच्या हद्दीत नांदे चांदे गावात कचरा प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या जागेवर स्थलांतरित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जागेचा आगाऊ ताबा मिळणार आहे.

५ जानेवारी पर्यंत ही जागा ताब्यात आल्यास तेथे लगेच स्थापत्य व विद्युत विषयक कामे सुरु करून ६ मार्च पर्यंत येथे नवीन प्रकल्प सुरु केला जाईल असे महापालिकेचे नियोजन आहे असे उपायुक्त संदीप कदम यांनी पत्रात नमूद केले आहे.

माजी आमदार कुलकर्णी यांनी महापालिकेच्या या आश्‍वासनास विरोध केला केला आहे. रहिवाशांसोबत झालेल्या बैठकीत कचरा प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद करून ३१ जानेवारीपर्यंत पूर्णपणे बंद केला जाईल. ६ मार्चपर्यंत नवीन ठिकाणी प्रकल्प सुरु केला जाईल असे ठरले होते. पण महापालिकेने याचा मोघम कृती आराखडा तयार केला आहे. या पत्रावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नाही. त्यामुळे प्रकल्प बंद करण्याचे ठोस आश्‍वासन मिळावे अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com