युनिटी करंडक क्रिकेट स्पर्धा

युनिटी करंडक क्रिकेट स्पर्धा
Published on: 

फोटो ः सिद्ध राठोड

राठोड, होलेची अर्धशतके

पुणे, ता. ५ ः युनिटी कमिटी आयोजित युनिटी करंडक क्रिकेट स्पर्धेत सिद्ध राठोड, राजवीर होलेच्या अर्धशतकाच्या जोरावर आर्यन्स अकादमीने आदिनाथ अकादमीचा ३३३ धावांनी पराभव केला.
लोणी काळभोर येथील क्रिकप्लस मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना आर्यन्स अकादमीने ९ बाद ४१९ धावा केल्या. यावेळी सिद्ध राठोडने ७७ चेंडूत तेरा चौकार व तीन षटकारासह ९५ धावांची, राजवीर होलेने सहा षटकारासह ५३ धावांची खेळी केली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी ८१ चेंडूत १२१ धावांची भागीदारी केली. प्रत्युत्तर देताना आदिनाथ अकादमीचा डाव ८६ धावांत आटोपला. यावेळी सक्षम लड्डाने ४० धावांची खेळी केली. प्रीतम पवार व वीर कोळेकरने प्रत्येकी तीन गडी बाद केले. ‘सामनावीर’ हा मान सिद्ध राठोडने पटकाविला.
संक्षिप्त धावफलक ः
आर्यन्स क्रिकेट अकादमी - (५० षटकांत) ९ बाद ४१९ (सिद्ध राठोड ९५, राजवीर होले ५३, वरद सागर ४१, रितेश मुंडे नाबाद ३८, केविन नाझरेथ २६, लक्ष्य पुनमिया १-२२, दिविशा सोळंकी १-२६) विजयी विरुद्ध आदिनाथ क्रिकेट अकादमी - (२१.२ षटकांत) सर्वबाद ८६ (सक्षम लड्डा ४०, वीर कोळेकर ३-६, प्रीतम पवार ३-१०, सोहम चव्हाण १-५).
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.