वाई:-भिवजेवाडी (मांढरदेवी) येथे मुलांसाठी वाचनालय साकार!. अमेरिकेतील सिद्धार्थची वाढदिवसाची पुस्तकांची अनोखी भेट!.

वाई:-भिवजेवाडी (मांढरदेवी) येथे मुलांसाठी वाचनालय साकार!. अमेरिकेतील सिद्धार्थची वाढदिवसाची पुस्तकांची अनोखी भेट!.

Published on

अमेरिकेतील सिद्धार्थची वाचनालयास मदत

भिवजेवाडीमध्ये पुस्तकांची अनोखी भेट; अनेकांकडून मदतीचा हात

वाई, ता. २९ : सातासमुद्रापार अमेरिकेत असलेल्या सिद्धार्थ प्रगती योगेश पवार या १७ वर्षांच्या मुलाने भिवजेवाडी (ता. मांढरदेव) येथील लहान मुलांच्या वाचनालयासाठी दहा हजार रुपये किमतीची पुस्तके उपलब्ध करून अनोखी भेट दिली.
भिवजेवाडी येथील मुलांची शिक्षणाविषयी असणारी तळमळ आणि त्यांची कष्ट घेण्याची वृत्ती कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. ही मुले दररोज शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी तीन तास जननीमाता मंदिरात अभ्यासाला बसतात. या मुलांचे भावविश्व आणि जाणीवा विस्ताराव्यात, म्हणून त्यांच्यासाठी एक सुंदर छोटेखानी वाचनालय सुरू करावे, अशी ग्रामस्थांची इच्छा होती. ही इच्छा वाईतील प्रशांत डोंगरे यांनी ओळखली. अमेरिकेतील १७ वर्षांचा सिद्धार्थ हा  वाढदिवसाचे टिपिकल सेलिब्रेशन सोडून काय करता येईल, अशा विचारात होता. त्याच्या आईने मुलांसाठी काही अर्थपूर्ण उपक्रम करण्याचा विचार मांडला. नुसता विचार न करता त्यांनी दहा हजार रुपये किमतीची तब्बल २५५ पुस्तके ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवली. त्यामाध्यमातून छोटे सुंदर वाचनालय आकारास येत आहे. ही कल्पना समजताच अनेक दानशूर व उत्साही लोकांनी आपला खारीचा वाटा उचलला. सर्वप्रथम विश्वास प्रकाशनाच्या वैशाली कार्लेकर यांनी बाल व कुमार संच दिले. अभय इनामदार यांनी रसिक साहित्य संस्थेशी जोडून दिल्याने श्री. दारवटकर यांच्यामार्फत पुस्तकांसाठी भरघोस सवलत मिळू शकली. ज्योती कुंटे, अनिल आठलेकर, शिरीष सहस्रबुद्धे आणि इतर अनेकांनी मदतीची इच्छा दर्शवली आहे. या वाडीतील शिकून शहरात गेलेले तरुण या चिमुकल्या वाचनालयासाठी कपाटाची व्यवस्था करत आहेत. मुलांनी पुस्तके मुक्त हाताळावीत, मनसोक्त वाचावीत, पुस्तकांच्या माध्यमातून कल्पनेच्या भराऱ्या घ्याव्यात, आपल्या जाणीवा आणि आपले विश्व विस्तारावे आणि समृद्ध व्हावे, या उद्देशातून आकाराला आलेल्या या वाचनालयाच्या पुस्तक वाटपाचा छोटासा कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाच्या संध्येस झाला. या वेळी रजनी हातेकर उपस्थित होत्या. या वाचनालयासाठी प्रशांत डोंगरे, अनिकेत कानडे, सूरज मांढरे आदींनी पुढाकार घेतला.
------
(छायाचित्र ओळी-
WAI26B07518, WAI26B07519
भिवजेवाडी (मांढरदेव) : वाचनालयासाठी आलेली पुस्तके हाताळताना विद्यार्थी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com