Vidhan Sabha 2019 : शिरोळे, बहिरट यांचे अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

विधानसभा 2019 
पुणे - शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांच्यासह चार जणांनी गुरुवारी (ता. ३) उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी शिरोळे यांनी मिरवणूक काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शिरोळे यांनी शिवाजीनगर गावठाणातील रोकडोबा मंदिरात दर्शन घेऊन, मिरवणुकीला सुरवात केली. आमदार विजय काळे, माजी खासदार अनिल शिरोळे, शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे, नगरसेवक प्रकाश ढोरे, आदित्या माळवे, मधुकर मुसळे, विजय शेवाळे आदी यात सहभागी झाले होते. 

दत्ता बहिरट यांनी शक्तिप्रदर्शन न करता, साधेपणाने उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, खासदार वंदना चव्हाण, आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ आदी उपस्थित होते. शिरोळे व बहिरट यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले. आम आदमी पक्षाचे (आप) शहराध्यक्ष मुकुंद किर्दत, वंचित बहुजन आघाडीचे अनिल कुराडे यांनीही अर्ज  दाखल केला. 

सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मतदारांच्या आशीर्वादाने मतदारसंघाच्या नियोजनबद्ध विकासासाठी बहुमताने मी निवडून येणार आहे, याचा मला विश्‍वास आहे.’’दत्ता बहिरट म्हणाले, ‘‘मतदारसंघातील नागरिकांचा मला पाठिंबा आहे. काँग्रेस पक्षावरील निष्ठा याच्या जोरावर या मतदारसंघातून माझा विजय निश्‍चित आहे.’’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddharth shirole  Datta bahirat filed nominations from Shivajinagar assembly constituency