पुणे : विजयादशमी संचलनात सिद्धार्थ शिरोळेंचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 October 2019

संघाच्या पुणे महानगराच्या विद्यापीठ भागातील शिवाजीनगर परिसरात आयोजित संचलनात सिद्धार्थ शिरोळे संघाच्या पूर्ण गणवेशासह सहभागी झाले होते.

पुणे : भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे शिवाजीनगर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे मंगळवारी (ता.8) सकाळी प्रचाराच्या धामधुमीतून वेळ काढत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी संचलनात सहभागी झाले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त शहरात मंगळवारी ठिकठिकाणी संचलन करण्यात आले. यापैकी संघाच्या पुणे महानगराच्या विद्यापीठ भागातील शिवाजीनगर परिसरात आयोजित संचलनात सिद्धार्थ शिरोळे संघाच्या पूर्ण गणवेशासह सहभागी झाले होते.

मंगळवारी सकाळी सात वाजता नरवीर तानाजी वाडी येथील खाशाबा जाधव शाळेपासून या संचलनास सुरूवात झाली. शिवाजीनगर बसस्थानक, इराणी वस्ती, पीएमसी कॉलनी, मुंबई-पुणे महामार्ग या मार्गावरून पुन्हा शाळेपाशी येत संचलनाचा समारोप झाला. या संचलनात एकूण २५० स्वयंसेवकांनी भाग घेतला.

नगराचे संघचालक डॉ. अविनाश वाचासुंदर, माजी खासदार अनिल शिरोळे, विद्यापीठ भागाचे सहकार्यवाह संजय एडके, जनता सहकारी बँकेचे संचालक बीरू खोमणे, सुभाष जेऊर, दिलीप पळशीकर, राहूल भोर, सुधीर आल्हाट यांच्यासह अनेक मान्यवरांनी संचलनात सहभाग नोंदवला. संचलनाच्या मार्गावर आकर्षक रांगोळी, फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. संचलनात सहभागी स्वयंसेवक आणि भगव्या ध्वजावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत होती.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- कार्यक्रम सुरू असतानाच काँग्रेसच्या नेत्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू

- अजित पवारांनी केली राष्ट्रवादीचेच 'हे' दोन अधिकृत उमेदवार पाडण्याची व्यवस्था

- सेना-भाजपचं मिशन 220 धोक्यात? बंडखोरांमुळे किमान 30 जागा अडचणीत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddharth Shirole participated in the Vijayadasami parade in Pune