भीमा वाहतेय दुथडी भरून;सिद्धटेक पूल वाहतूकीसाठी बंद

सकााळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

सिद्धटेक पुलावरील वाहतूक रविवार रात्री सात वाजल्यापासून दौंड पोलिसांनी बंद केली आहे. नदीकाठच्या परिसरात कुठलीही प्रशासकीय मदत येथील नागरिकांना मिळाली नाही. नदीकाठच्या नागरिकांनी आपआपल्या पद्धतीने स्थलांतर केले आहे.

पुणे ः चार दिवसांच्या संततधार पावसामुळे भीमा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील सहा गावांचा दौंड शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. दरम्यान, नगर व पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या सिद्धटेक पुलावरून रविवारी रात्री मध्यरात्रीपासून पाणी वाहू लागल्याने येथील पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

रविवारी रात्रीपासून दौंड येथून एक लाख एक्क्यान्नव हजार 788 क्युसेक वेगाने पाणी वाहत असून, भीमा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दौंड येथे 504 मीटर ही धोक्याची पातळी आहे. सध्या 505.950 मीटरने धोक्याची पातळी ओलांडून नदी प्रवाह वाहत आहे. रविवारपासून पुराच्या पाण्यात प्रचंड वाढ झाल्याने उजनी धरण पातळीतही कमालीची वाढ झाली आहे. सध्या उजनी धरण साठ्यात 67.60 टक्के वाढ झाली आहे.

सिद्धटेक पुलावरील वाहतूक रविवार रात्री सात वाजल्यापासून दौंड पोलिसांनी बंद केली आहे. नदीकाठच्या परिसरात कुठलीही प्रशासकीय मदत येथील नागरिकांना मिळाली नाही. नदीकाठच्या नागरिकांनी आपआपल्या पद्धतीने स्थलांतर केले आहे. परिसरातील नदीकाठच्या शेतीत पाणी घुसल्याने शेतीचे व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. सिद्धटेक भीमा नदी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddhatek Bridge closed for vehicles