सिध्देश्वर बॅंकेची वार्षिक सभा

सिध्देश्वर बॅंकेची वार्षिक सभा
Published on

टिपः जाहिरात बातमी
---
PNE26W45810
सोलापूर : सिद्धेश्वर बॅंकेच्या वार्षिक सभेत प्रतिमापूजनप्रसंगी राजशेखर शिवदारे, नरेंद्र गंभिरे व इतर मान्यवर.
---
सिद्धेश्वर सहकारी बॅंकेकडून
१० टक्के लाभांश जाहीर
बॅंकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २९ : येथील सिद्धेश्वर सहकारी बँक लिमिटेडच्या ५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. भवानी पेठेतील सांस्कृतिक भवनात ही सभा झाली. यावेळी बँकेचे मार्गदर्शक राजशेखर शिवदारे यांचा सत्कार करण्यात आला.
चेअरमन नरेंद्र गंभिरे यांनी बँकेने गेल्या पाच दशकांत जिल्ह्यातील अग्रणी बँक म्हणून आपली ओळख कायम राखल्याचे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय घाळे यांनी बँकेला ७ कोटी ४१ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती दिली. बँकेचे मार्गदर्शक शिवदारे यांनी एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केल्याबद्दल बँकेचे कौतुक केले.
यावेळी उपाध्यक्षा सुचेता थोबडे, संचालक रूपाली बिराजदार, अशोक लांबतुरे, एम. के. पाटील, पशुपतिनाथ माशाळ, शिवानंद कोनापुरे, बाळासाहेब आडके, भीमाशंकर म्हेत्रे, प्रकाश हत्ती, सिद्धेश्वर मुनाळे, महेश सिंदगी, तज्ज्ञ संचालक श्रीधर रिसबुड, जनरल मॅनेजर (बँकिंग) राम शर्मा, कार्यकारी संचालक राजेश कलशेट्टी व बसवराज कोरवार आदी उपस्थित होते.
सभासद व भुसार आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश चिक्कळी, माजी संचालक सिद्धय्या स्वामी हिरेमठ यांनी मनोगत व्यक्त केले. अंतर्गत लेखापरीक्षक सुभाष मुनाळे, डॉ. सिद्धेश्वर वाले, शिवानंद पाटील, मल्लिनाथ विभूते, चंद्रकांत रमणशेट्टी आदी उपस्थित होते. मल्लिनाथ पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्षा सुचेता थोबडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com