पंतप्रधानांची भेट अविस्मरणीय क्षण : सिध्दी पवार

modi.jpg
modi.jpg

बारामती शहर : चांद्रयान मोहिमेत काही कारणाने अपयश आले असले तरी हे मोठे लक्ष्य होते, ते साध्य करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, यश अपयश यांचा विचार न करता लक्ष्य नजरेसमोर ठेवून काम करत राहायचे....असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या बंगळूरस्थित नियंत्रण कक्षात उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. 

इस्त्रोच्या वतीने आयोजित प्रश्नमंजूषा कार्यक्रमात यशस्वी देशभरातील 75 विद्यार्थ्यांना बंगळूर येथे पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यात बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीर शाळेची विद्यार्थीनी सिध्दी विश्वंभर पवार हिचाही समावेश होता. 

दरम्यान, पंतप्रधानांच्या भेटीनंतर तिने सकाळशी बोलताना हा जीवनातील एक अविस्मरणीय क्षण असल्याचे नमूद केले. सिध्दी म्हणाली, चांद्रयानाची मोहिम काही कारणाने यशस्वी झाली नसली तरी पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांना जो धीर दिला व विद्यार्थ्यांशीही संवाद साधताना त्यांनी यश अपयशाची चिंता न करता काम करत राहण्याचा जो संदेश दिला त्याने माझा आत्मविश्वास अधिक वाढला. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत त्यांनाही प्रोत्साहित केल्याने आम्हाला ही भेट अविस्मरणीय अशीच वाटली. 

दरम्यान, सिध्दी पवार हिने या प्रश्नमंजूषा कार्यक्रमात पाच मिनिटात वीस प्रश्नांची अचूक उत्तरे देत हे यश प्राप्त केले होते. थेट पंतप्रधानांसमवेत उपस्थित राहून त्यांचे विचार प्रत्यक्षपणे ऐकण्याची संधी मिळाल्याने तिचा आनंद गगनात मावत नव्हता. या भेटीमुळे जीवनात काहीतरी करुन दाखविण्याची प्रेरणा मिळाली आणि आम्ही पण नक्की यातून काहीतरी करुन दाखवू असा विश्वास तिने सकाळशी बोलताना व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com