कोपर्डे हवेली : अपक्ष उमेदवारांचे शक्ती प्रदर्शनाने शुभारंभ...

कोपर्डे हवेली : अपक्ष उमेदवारांचे शक्ती प्रदर्शनाने शुभारंभ...

Published on

विद्या वेताळ, अमित पाटील यांचे शक्तिप्रदर्शन

कोपर्डेतील सिद्धनाथ मंदिरात प्रारंभ; भाजप-राष्ट्रवादीचा सावध पवित्रा

कोपर्डे हवेली, ता. १ : कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील अपक्ष उमेदवार विद्या वेताळ, पंचायत समिती कोपर्डे गणातील उमेदवार अमित पाटील आणि वाघेरी गणातील अपक्ष उमेदवार नीलम पिसाळ यांच्या प्रचाराचा भव्य प्रारंभ आज सिद्धनाथ मंदिरासमोर शक्तिप्रदर्शनाने झाला. या कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला, ज्यामुळे अपक्ष उमेदवारांच्या पाठीशी जनतेचा मोठा पाठिंबा असल्याचे दिसून आले.

प्रचाराच्या प्रारंभासाठी सिद्धनाथ मंदिरात नारळ फोडून श्रीगणेशा करण्यात आला. त्यानंतर गावातून भव्य रॅली काढण्यात आली, ज्यात शेकडो नागरिक सहभागी झाले. अपक्ष उमेदवार असूनही या कार्यक्रमाला गर्दी झाली, तर दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाने प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत याच ठिकाणाहून प्रचार सुरू केला. मात्र, त्यांचा पवित्रा सावध दिसून आला.

अपक्ष उमेदवारांच्या प्रचार प्रारंभप्रसंगी भाजपचे किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश कुंभार, कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अपक्ष उमेदवारांच्या समर्थकांनी सांगितले, की कोपर्डे हवेली गटाचा स्वाभिमान अबाधित ठेवण्यासाठी स्वच्छ प्रतिमेचे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे आणि विकासासाठी प्रामाणिकपणे झटणारे उमेदवार निवडणे गरजेचे आहे. विकासाच्या नावाखाली झालेल्या अन्यायाला जनता मतपेटीतून उत्तर देईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त करत समर्थक अपक्ष उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमात माजी सरपंच लाला जगदाळे, जालिंदर पवार, अंकुश थोरात, श्रीरंग चव्हाण, सुभाष चव्हाण, रंगराव चव्हाण, सागर चव्हाण, दत्तात्रय पाटील, लक्ष्मण चव्हाण, कृष्णा चव्हाण, शिवसेना अध्यक्ष भानुदास पोळ, उपसरपंच बाळासाहेब पवार, सोपान चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य राहुल यादव, आनंदराव शिंदे, सुभाषराव जाधव, रणजित यादव, भीमराव पाटोळे, याकुब पटेल, ज्योतिराम कणसे यांच्यासह सुर्ली, कामथी, पाचुंद, मेरवेवाडी, वाघेरी, करवडी, वडोली निळेश्वर, कोपर्डे हवेली, अंतवडी, शहापूर, यशवंतनगर, नडशी, शिरवडे आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

02359
कोपर्डे हवेली ः येथील सिद्धनाथ मंदिरात अपक्ष उमेदवाराच्या प्रचार प्रारंभप्रसंगी उपस्थित जनसमुदाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com