FDA Crime : औषधांच्या नावातील साधर्म्य पडले महागात; एफडीएकडून कॅडिलावर कारवाई, राज्यातील तीन गोदामांचे वितरण परवाने रद्द

अहमदाबाद येथील कॅडिला फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपनीने ‘ॲसिलॉक’ या एकाच ब्रँड नावाखाली दोन वेगवेगळे औषध घटक असलेली औषधे बाजारात उपलब्ध असल्याचे तपासणीत आढळले होते.
FDA Crime

FDA Crime

ESakal

Updated on: 

पुणे - अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी असलेल्या दोन वेगवेगळ्या गोळ्यांना औषधनिर्माण कंपनीने थोडा बदल करत एकच नाव दिले. त्‍याने औषध विक्रेत्यांची व रुग्‍णांची दिशाभूल होण्याचा धोका निर्माण झाला. त्‍यावरून राज्‍याच्‍या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कॅडिला फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या पुण्यासह नागपूर आणि ठाणे येथील गोदामांमधील औषध विक्री व वितरण परवाने रद्द केले आहेत. ‘ॲसिलॉक’ व ‘ॲसिलॉक +’ या ब्रँड नावाखाली दोन वेगवेगळे औषध घटक असलेल्या औषधांची विक्री करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com