
पुणे : सातबारा उताऱ्यावरील ‘अपाक शेरा’, ‘एकुमॅ (एकत्र कुटुंब मॅनेजर) नोंद’, ‘तगाई कर्ज’, बंडिंग कर्ज’, ‘भूसुधार कर’, ‘इतर पोकळीस्त’ अशा कालबाह्य नोंदी आता कमी होणार आहेत. त्यामुळे सातबारा उतारा अधिक स्पष्ट आणि सुटसुटीत होणार असून, समजण्यास सोपा होणार आहे.