वर्देत तरुणीचा खून

वर्देत तरुणीचा खून
Published on: 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात
तरुणीचा खून
कुडाळ (जि.सिंधुदुर्ग), ता. १७: तालुक्यातील वर्दे या छोट्या गावात आज एका महाविद्यालयीन तरुणीचा चाकूने वार करीत निर्घृण खून करण्यात आला. सायंकाळी उशिरा हा प्रकार घडला. दामिनी किरण पालव (वय २३) असे मृत तरुणीचे नाव आहे. यातील हल्लेखोर पसार झाला आहे. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिसांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी: दामिनी पालव ही हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होती. ती शनिवारी सायंकाळी कडावल येथील बसस्थानकावर उतरून वर्दे येथील घराच्या दिशेने होती. याच दरम्यान वाटेत तिच्यावर चाकूने वार करून तिचा खून करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर अधीक्षक नयोमी साटम यांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपास सुरू करण्यात आला असून, हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी प्रयत्न केले जात आहेत. संशयिताला पकडण्यासाठी सहा पोलिस पथके कार्यरत आहेत. ओरोस येथील जिजामाता सर्कलसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com