

सिंधुदुर्गात पुन्हा मुसळधार पाऊस
भात कापणीत व्यत्यय; ईशान्य मॉन्सूनचा जोर कायम
वैभववाडी (जि.कोल्हापूर), ता. २४ : जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ले तालुक्यांच्या बहुतांश भागांत विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झाला. पावसाचा आजचा सलग तिसरा दिवस आहे. काही शेतकऱ्यांनी पावसामुळे भातपीक कापणी थांबविली आहे. जिल्ह्यात ईशान्य मॉन्सूनचा जोर कायम आहे. शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यातील वेंगुर्ले, कुडाळ आणि कणकवली तालुक्यांच्या काही भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. त्यानंतर आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.
दुपारनंतर जिल्ह्यात पावसाचे ढग दाटून आले. सावंतवाडी तालुक्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तालुक्याच्या काही भागाला पावसाने तासभर झोडपून काढले. विजांचा कडकडाट देखील अधिक होता. त्या पाठोपाठ कुडाळ तालुक्यात देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली. वेंगुर्ले-तुळस परिसरातील अनेक गावांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. या भागात वादळी वाऱ्यासह पाऊण तास पाऊस झाला. याशिवाय संपूर्ण जिल्ह्यात पावसाचे वातावरण आहे. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी सर्वत्र स्थिती आहे.
झाड पडल्याने वाहतूक ठप्प
सावंतवाडी : आज दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे सावंतवाडी-आंबोली राज्य मार्गावर नगरपालिका कचरा डेपोच्या शेजारी भले मोठे झाड अचानक रस्त्यावर कोसळले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे राज्यमार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन रस्त्यावर वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. झाड कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिकांनी स्वतःहून पुढाकार घेत झाड बाजूला करून रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.