सिंधूताईंचे नाव वापरून फसवणूक; अनाथ मुलींच्या लग्नाची बतावणी करून उकळले पैसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sindhutai Sapkal

सिंधूताईंचे नाव वापरून फसवणूक; अनाथ मुलींच्या लग्नाची बतावणी करून उकळले पैसे

मुंबई - 'अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या दिवंगत सिंधूताई सपकाळ यांच्या संस्थेचे नाव वापरुन सायबर चोरट्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. (Sindhutai Sapkal news in Marathi)

हेही वाचा: दिवाळीच्या तोंडावर पोलीस निरीक्षकाचं थेट CM शिंदेंना पत्र; तुमचेही डोळे पाणावतील

"द मदर ग्लोबल फाऊंडेशन" या संस्थेने अनेक गरीब मुलींचे लग्न लावून देण्यात मदत केली आहे. त्याचप्रमाणे आम्ही काम करत असून आमच्याकडे लग्नासाठी मुली आहेत, असे सांगून चोरट्यांनी अनेकांकडून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुण्यात देखील अशी फसवणूक होत असल्याची शक्यता विनय सपकाळ यांनी व्यक्त केली आहे. पुण्यासह मुंबई, जळगाव, संभाजीनगर या ठिकाणी देखील प्रकार होत असल्याचं संस्थेने सांगितलं आहे. व्हॉट्स ऍपद्वारे किंवा मोबाईलवरून मॅसेजद्वारे मदतीचे आवाहन करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics : रश्मी ठाकरेंमुळे शिंदे - ठाकरे गट भिडणार? ठाणे दौऱ्याबद्दलची भीती

फसवणुकीनंतर बदलापूर येथे पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. तसेच अशा फसवणुकीला बळी न पडण्याचे आवाहान संस्थेतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे. सिंधूताई सपकाळ यांचे निधन ४ जानेवारी रोजी झाले आहे.

टॅग्स :Pune Newscrime