गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची पुण्यात आत्महत्या; घटनेनं खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news india A youth commit suicide because he did not get job unemployment

गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची पुण्यात आत्महत्या; घटनेनं खळबळ

पुणे : सिने अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकरच्या (Ketaki Mategaonkar) चुलत भावाने केली आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्षय अमोल माटेगावकर (Akshay Mategaonkar ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नोकरी न मिळण्याच्या भीतीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याचे अक्षयने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत त्याने नमूद केले आहे. या घटनेनंतर सुसगाव परिसरात खळबळ उडाली आहे. (Ketaki Mategaonkar Cousin Brother News )

अक्षय सिम्बॉयसिस महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या चौथ्या वर्षात शिकत होता. त्याने एका आयटी कंपनीत इंटर्नशिप केली होती. त्यानंतर काही कंपन्यांमध्ये नोकरीसाठी त्याने अर्जही केले होते. मात्र त्याला नोकरी मिळत नव्हती. या भीतीमुळे त्याने आत्महत्या केली असा उल्लेख त्याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. अक्षयची आई मीनल माटेगावकर या मुंबईत प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत, वडील अमोल माटेगावकर हे नामांकित कंपनीत काम करतात. या घटनेनंतर माटेगावकर कुंटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Singer Ketki Mategaonkar Cousin Brother Commits Suicide In Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..