
ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं निधन, पुण्यात घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाट्यात मोलाची कामागिरी केलेल्या कीर्ती शिलेदार यांचं आज निधन झालं आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. डायलिसिसचे उपचार सुरू असल्याने त्यांची तब्येत आणखी खालावली. (Kirti shiledar died in pune)
संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. नाट्य संगीतातील त्यांच्या घराण्याचा वारसा कायम स्मरणात राहिल. नाट्यसंगीताचा वारसा त्यांनी वाढवला आणि संपन्नतेने पुढे नेला. संगीत नाटकांना उतरती कळा लागल्यानंतर जयराम शिलेदार यांच्यासोबत कीर्तीताई यांनीही मोलाची कामगिरी बजावली. घरातूनच त्यांना बाळकडू मिळालं होतं. त्यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय झाल्या. लहान वयात त्यांनी पदार्पण केलं. नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळही लक्षात राहिल, असाच गेला.2018 साली त्यांनी हे अध्यक्षपद भूषवलं होतं.
घारण्याचा वसा पन्नास दशकं अविरत
वयाच्या दहाव्या वर्षी कीर्तीताईंनी रंगभूमीवर पदार्पण केलं. जवळपास पाच दशकं त्यांनी नाट्यसंगीतात योगदान दिलं. आपल्या अभिनयाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर वेगळा ठसा उमटवला होता. त्याचे वडील जयराम शिलेदार यांनी व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. तर आई जयमाला यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता. पुरस्कार मिळाल्यानंतर तीनच महिन्यात त्यांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त झाली.
Web Title: Singer Kirti Shiledar Died In Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..