Pune News : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला ईपीएफओचा दणका; १२० कोटी ९० लाख रुपये पीएफ भरण्याचे आदेश!

Singhad Education Society : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीने ३,५६२ कर्मचाऱ्यांचा १२० कोटी ९० लाख रुपयांचा भविष्य निर्वाह निधी न भरल्याने ईपीएफओने कठोर आदेश दिले आहेत. बनावट कागदपत्रांमुळे सोसायटीविरोधात फौजदारी कारवाईचेही निर्देश देण्यात आले आहेत.
EPFO Orders Singhad Education Society to Pay ₹120.90 Crore PF Dues

EPFO Orders Singhad Education Society to Pay ₹120.90 Crore PF Dues

Sakal
Updated on

पुणे : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्‍या अंतर्गत विविध शैक्षणिक संस्‍थांमध्‍ये काम करणाऱ्या ३ हजार ५६२ कर्मचाऱ्यांची १२० कोटी ९० लाख १७ हजार २२९ रुपये भविष्‍य निर्वाह निधीची (पीएफ) रक्‍कम संस्‍थेने जमा केली नाही. मार्च २०१४ ते डिसेंबर २०१८ या कालावधीतील ही रक्‍कम येत्‍या दोन महिन्‍यांत ती कर्मचाऱ्यांच्‍या भविष्‍य निर्वाह निधी खात्‍यांमध्‍ये जमा करावी. अन्‍यथा सोसायटीने मालमत्‍तेची जप्‍तीची कारवाई करण्‍यात येईल, असा आदेश प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com