पुणे - सिंहगड इंस्टिट्यूटने पुणे महापालिकेचा ४७ कोटी ४३ लाख रुपयांचा मिळकतकर थकविला असून, न्यायालयदेखील थकबाकीची रक्कम त्वरित भरावी असे आदेश दिलेले आहेत. तरीही अनेक महिने न भरल्याने एरंडवणे भागातील संस्थेचे मुख्य कार्यालयासह २६ इमारती जप्त करण्यात आल्या आहेत. एका महिन्याच्या आत ही पूर्ण रक्कम न भरल्यास या इमारतींचा लिलाव करून रक्कम वसूल केली जाईल अशा इशारा दिला आहे. मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी ही माहिती दिली.